2nd March 2026

माहितीचा खजिना एका क्लिक वर !

भाजपला धक्का एकनाथ पवार उद्धव ठाकरे यांच्या गळाला

येत्या काही महिन्यांमध्ये लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुका आहेत. निवडणुकांच्या तोंडावर पिंपरी-चिंचवड शहरामध्ये इनकमिंग व आउटगोइंगला सुरुवात झाली आहे. ऐन निवडणुकांच्या तोंडावर भाजपला धक्का बसणार असून शहरातील भाजपचे माजी सत्तारूढ पक्षनेते तथा प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार उद्धव ठाकरे यांच्या गळाला लागले आहेत. येत्या काही दिवसांत ते मुंबईमध्ये मातोश्रीवर शिवबंधन हाती बांधणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.

भाजपचे प्रदेश प्रवक्ते पवार हे नितीन गडकरी यांचे विश्वासू मानले जातात. त्यांनी २०१४ मध्ये भोसरी विधानसभेतून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी तब्बल ५२ हजार मते घेतली होती. पुढे महेश लांडगे भाजपमध्ये आल्याने त्यांना विधानसभा लढवण्याची संधी मिळाली नाही. मात्र, निवडणूक लढवण्याची त्यांची सुप्त इच्छा लपून राहिली नाही. पिंपरी-चिंचवड शहरात संधी मिळत नसल्याने त्यांनी गेल्या चार वर्षांपासून लातूर लोकसभेत येणाऱ्या लोहा-कंधार या विधानसभा मतदारसंघात लढण्याची तयारी केली आहे. तेथे सध्या शेकापचे श्यामसुंदर शिंदे आमदार आहेत. शेकाप खालोखाल त्या मतदारसंघात शिवसेनेचे वर्चस्व आहे. त्यामुळेच एकनाथ पवार यांनी ठाकरे गटात प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. येत्या काही महिन्यांमध्ये लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुका आहेत. शहरामध्ये इनकमिंग व आउटगोइंगला सुरुवात झाली आहे.

एकनाथ पवार गडकरींचे खंदे समर्थक

एकनाथ पवार हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे खंदे समर्थक मानले जातात. त्यांनी २०१४ ला भोसरी विधानसभा लढवली होती. त्यावेळी त्यांना ५२ हजार मते पडली होती. त्यानंतर त्यांनी मागच्या वेळी महापालिकेत सभागृह नेते म्हणून काम पाहिले होते. गेले अनेक दिवस ते भाजप सोबत एकनिष्ठ आहेत. मात्र त्यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतल्याने भोसरीमध्ये भाजपला धक्का देखील बसू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top